मंत्रालय डय़ुटी वरील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा देगलूरकर यांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण !
रोहितीच्या पत्नीने सुवर्णा यांचे आभार व्यक्त केले


मुंबई – मंत्रालयाशेजारील आकाशवाणी समोर एक व्यक्ति बेशुद्ध असल्याचे मंत्रालय डय़ुटी वरील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा देगलूरकर यांच्या लक्षात आले. प्रसंगावधानाने सुवर्णा यांच्या चतुराईने बेशुद्ध व्यक्तीचे प्राण वाचविण्यात सुवर्णा यांना यश मिळाले त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिसांची नोकरी कायम ताण तणावाची परंतु, ताण तणाव बाजूला ठेवून सज्जक आणि दक्ष राहण्याची पोलिसांची कामगिरी खुप महत्तवाची, आकाशवाणी समोरील बाकावर बेशुद्ध असलेल्या व्यक्तीला पाहुन अनेक लोकांनी निदर्शनास आले. परंतु, बेशुद्ध व्यक्तीला पाहुन अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुवर्णा देगलूकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर तत्काळ कार्यवाही करून बेशुद्ध व्यक्तीचे प्राण वाचवले.
आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने उचलून रुग्णवाहिकेवरील डॉ. रफीक शेख यांच्याकडून तपासणी करून त्या व्यक्तीला तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यात आले. अंमलदारासह मंत्रालयातील रुग्णवाहिकेमधून त्याला जीटी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले. बेशुद्ध व्यक्तीचे जवळील असलेल्या वस्तुच्या आधारे सदर व्यक्तीचे नाव रोहित आर्य असून रोहित जवळ उपोषणासंबंधी काहि कागदाच्या प्रति निदर्शनास आल्याने. रोहित हा पीएलसी स्वच्छ मॉनिटर प्रकल्पाचा तो प्रकल्प अधिकारी असून त्यांचे उपोषण ९ दिवस चालले होते, असे लक्षात आले. परंतु त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने तो किती वेळ बेशुद्ध होता याचा अंदाज पोलिसांना आला नाही. त्याच्याकडील मोबाईलच्या आधारे रोहितच्या पत्नीशी संपर्क साधून रोहितच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली असल्याचे सुवर्णा देगलूरकर यांनी सांगितल्या बद्दल रोहितीच्या पत्नीने सुवर्णा यांचे आभार व्यक्त करत, प्रशंसा केली…






