
मुंबई – गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते. येत्या गणेशोत्सवात देखील या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. अजून मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही आणि म्हणूनच या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यावर्षी देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
अशा स्थितीत आता 27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास जलद अन सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली आहे.
–
गणेशोत्सवाला प्रवास होणार वेगवान
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. भक्तांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी 23 ऑगस्ट पासून मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
16 टन व त्यापेक्षा अधिक वजन असणाऱ्या वाहनानकरिता हा रस्ता बंद ठेवला जाणार आहे. 23 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 ते 29 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 या काळात अवजड वाहनांसाठी मार्ग बंद ठेवला जाईल.
2 सप्टेंबर सकाळी 6 ते चार सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद राहील. तसेच 6 सप्टेंबर सकाळी 8 ते 8 सप्टेंबर रात्री आठ वाजेपर्यंत हा मार्ग अवजड वाहनांना बंद राहील. रायगड जिल्हा अधिकारी किशन जावळे यांनी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी हा आदेश जारी केला आहे.
या आदेशामुळे मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्याला जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. नक्कीच प्रशासनाने घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. या निर्णयामुळे महामार्गावर गर्दीच्या काळातही वाहतूक कोंडीची समस्या भेडसावणार नाही.