मुंबई,दि.१४: राज्यात आज बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून ते १ मे २०२१ सकाळी ७ वा. पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.या अंतर्गत हे सुरू रहाणार:
१) किराणा मालाची दुकाने,दूध डेयरी,बेकरी व कन्फेक्शनरी व सर्व प्रकारची खाद्यपदार्थ विक्री ची दुकाने,फळविक्रेते.
२)कोल्ड स्टोरेजेस, वेअरहाऊसिंग
३)विमान वाहतूक,रेल्वे सेवा, बस सेवा,टॅक्सी व रिक्षा तसेच सार्वजनिक बस वाहतूक
४) बँक, एटीएम केंद्रे,पोस्ट ऑफिसेस, सेबी ने निर्धारित केलेल्या संस्था
५)टेलिकॉम मेंटेनन्स सुविधा
६) सामान वाहतूक
७)शासकीय अधिस्वीकृती धारण करणारे पत्रकार
८) इ कॉमर्स (फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा)
काय रहाणार बंद?
१) अत्यावश्यक सेवेत न मोडणारी सर्व दुकाने व आस्थापना.
२) शाळा व महाविद्यालये, जीम, खाजगी कोचिंग क्लासेस,तरणतलाव, सर्व प्रकारची सार्वजनिक ठीकाणे, बागबगिचे,सिनेमा हॉल, नाट्यगृहे,उपहारगृह(पार्सल सेवेला अनुमती)बार व रेस्टौरंट,शॉपिंग मॉल्स,वॉटर पार्क्स, मनोरंजन पार्क्स,
३) सर्व धार्मिक स्थळे,सलून, ब्युटी पार्लर्स