महाराष्ट्रमुंबई
विधिमंडळाचे 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सोमवार, दि. १६ ते शनिवार, २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.