मुंबईमहाराष्ट्र

झोपडपट्टी पुनर्वसन व विविध योजनांच्या समस्या निवारणार्थ शिबिराचे आम अतुल भातखळकर यांचेकडून आयोजन

मुंबई: कांदिवली पूर्व विधानसभा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने समाधान शिबिराचे उदघाटन कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर शिबिराअंतर्गत – अभय योजना (परिशिष्ट – II प्रकरणे), वारसपत्र, सदनिका हस्तांतरण, परिशिष्ट – II मध्ये घर मिळालेल्या संस्थेच्या भागदाखल्यावर पती/पत्नी यांची संयुक्त नाव नोंदणीकरिता तसेच झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातील समस्यांचे निरसन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी  सचिन गिरी तहसिलदार  अय्युब तंबोली व तहसिलदार विजय तळेकर यांच्यासह झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या शिबिरास उपस्थित होते.

मुख्यमंत्री माननीय  देवेंद्र फडणवीसजी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातले लागू केलेल्या धोरणांमुळे झोपडपट्टी रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी देवेंद्रजी आणि महायुती सरकारचे आभार आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रसंगी व्यक्तं केले. तसेच, परमार कुटुंबियांचे SRA अंतर्गत रखडलेले काम आमदार अतुल भातखळकरांच्या प्रयत्नाने मार्गी लागले, आजच्या शिबिराच्या निमित्ताने  परमार यांना पात्रतेचा दाखला देण्यात आला.
या समाधान शिबिरचा नागरिकांनी अधिक लाभ घ्यावा असे आवाहन भातखळकर यांनी केले तसेच हे समाधान शिबीर पुन्हा कांदिवली पूर्व विधानसभेत आयोजित करण्यात येईल असे आश्वासन आमदार भातखळकर यांनी या प्रसंगी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!