कोंकणमहाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांचे रत्नागिरीकरांना जाहीर आवाहन !

रत्नागिरी: मी, उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा, आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की रत्नागिरी व परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे परिस्थिती गंभीर आहे.
← नागरिकांनी सतर्क राहावे व विनाकारण घराबाहेर पडू नये.
← केवळ अत्यावश्यक कारणास्तवच घराबाहेर पडावे.
प्रशासन, पोलीस यंत्रणा, महानगरपालिका व आपत्कालीन सेवा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनास सहकार्य करणे
ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
← सेवाभावी संस्था देखील मदतीसाठी तत्पर आहेत. रत्नागिरीच्या संस्कृतीनुसार आपण सर्वांनी एकत्र राहून या कठीण परिस्थितीचा सामना करूया.
पाऊस पूर्ण थांबेपर्यंत सुरक्षित राहा, प्रशासनास सहकार्य करा.