ब्रेकींग: मुंबईत मोनो रेल उन्नत मार्गावर अडकली; सव्वा तासानंतर काचा फोडून प्रवाशांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू

मुबई: चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मुंबईतील सुरक्षीत मानली जाणारी मोनोरेल आज सायंकाळी ६.३० च्या दरम्यान उन्नत मार्गावर कलंडून अडकली आणि सुमारे दोन तास संपूर्ण काळोखात अडकून प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले.
मुबईतील नागरिकांना पावसाने प्रचंड झोडपल्याने बस,ट्रेन जवळपास ठप्प झाल्याने मोनो रेल चा आसरा घेणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले. चेंबूर-भक्तीपार्क दरम्यान मोनोरेल मध्येच कलंडून अडकली अडकली ज्यामुळे रेल्वे मधील वीजप्रवाह बंद पडून काळोख पसरला आणि प्रवाशी सुमारे दोन तास गुदमरल्याने आणीबाणी ची परिस्थिती निर्माण झाली.
गेल्या सुमारे दोन तासापासून ही मोनोरेल अडकून पडलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत आहे. त्यामुळे सगळीकडे आरडाओरड सुरु आहे.मात्र जवळपास दीड तासानंतर मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाश्यांना क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढले जात आहे. घटनास्थळी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मोनोरेलचा दरवाजा उघडून प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. आतमधील प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बचाव पथकासमोर हात जोडल्याचे दिसत आहे.
मोनो रेल्वे सायंकाळी 6.15 वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या क्रमांकावर संपर्क साधला. याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.