महाराष्ट्रमुंबईशैक्षणिक

गणेशोत्सव सुट्टी यंदा 10 दिवस, जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाकडून पत्रक जाहीर

मुंबई : राज्य सरकारकडून इयत्ता पहिली आणि दुसरीच्या नव्या शैक्षणिक रचनेविषयी मार्गदर्शक तत्वे आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पत्रक जारी केले आहे. यामध्ये सुट्ट्यांचा आराखडा दिला आहे. यात यावर्षी गणेशोत्सवाची सुट्टी १० दिवसांची आहे.

गणपती सुट्टी २५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर असे १० दिवस राहणार आहे. दिवाळी सुट्टी १८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर असे एकूण १३ दिवस राहणार आहे. उन्हाळी सुट्टी २ मे ते १३ जून २०२६ अशी ३७ दिवस राहणार आहे.

किरकोळ सुट्टया ३४ दिवस, हिवाळी सुट्टी १३ दिवस, उन्हाळी ३७ दिवस असे ८४ दिवस सुट्टी राहणार आहे. हिवाळी सुट्टीनंतर ३ नोव्हेंबर २०२५ रोजी तर उन्हाळी सुट्टीनंतर १५ जून २०२६ रोजी शाळा सुरु होईल असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या पत्रात नमूद केले आहे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, ईद ए मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना, महात्मा गांधी जयंती, विजयादशमी, गुरुनानक जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, नाताळ, मकर संक्रात, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, होळी पौर्णिमा, गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन या दिन विशेषांना प्रत्येकी एक दिवस सुट्टी जिल्ह्यातील जि. प. च्या प्राथमिक शाळांना राहील. स्थानिक सुट्टया ३ दिवस राहणार आहेत. सर्व उर्दू शाळा शुक्रवारी सकाळी ७.२० ते १०.३० या दरम्यान भरणार आहेत. शनिवारी त्या १०.३० ते ५ यावेळेत भरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!