मुंबईकरांनो उद्या एक्सप्रेस-वेने प्रवास करणार असाल तर आधी हे वाचा

मुंबई:- रविवार आणि नाताळची सुट्टी जोडून आल्याने अनेकांनी पिकनिकचा प्लॅन बनवला आहे. याच प्लॅनमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे सध्या जाम झाल्याचं चित्र आहे. आज देखील दिवसभर मुंबई बाहेर पडलेल्या नागरिकांना प्रचंड ट्रॅफिकचा सामना करावा लागला आहे. आजच्या या ट्राफिकमुळे अनेकांच्या पिकनिक प्लॅनचं नियोजन फिस्कटलं आहे.
सध्या एक्सप्रेस- वे वरील वाहतूक संथ गतीने सुरू असून मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या अनेक गाड्यांना स्लो मूविंग ट्रॅफिकचा फटका बसलाय. उद्या ही हीच परिस्थिती कायम असणार आहे. त्यामुळे तुम्ही एक्सप्रेस वे ने प्रवास करण्याचा प्लॅन करणार असाल तर थांबा आणि ही बातमी पूर्ण वाचा.
एक्सप्रेस वे व्यतिरिक्त पर्यायी मार्गाचा वापर म्हणून तुम्ही जुन्या मार्गाचा देखील पर्याय निवडू शकता. येथील वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे. याच सोबत उद्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी एकदा गुगल मॅप सुरू करून त्यावर एक्सप्रेस-वेचा अपडेटेड स्टेटस तुम्ही पाहू शकता आणि पुढील प्रवास सुखकर करू शकता.