मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपलं Google Pay अकाऊंट असं करा बंद,तरच मोठं नुकसान टळेल

मुंबई:- सध्या आपण मोबाईल वरून सगळ्या प्रकारचे व्यवहार करू शकतो. ऑनलाईन व्यवहारामुळे आपला बराचसा वेळ वाचतो. यासोबत आपल्याला पैसे आपल्या खिशात वागवावे लागत नाहीत. या सर्वांचा विचार करून आपल्या मोबाईलमधील पेटीएम, गुगल पे, यांसारख्या विविध ॲप्सचा आपण वापर करतो.
मात्र, कधी फोन हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका देखील बसू शकतो. त्यामुळे मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काय करावं लागेल याची आपण माहिती घेऊयात.
आपला मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास सर्वात आधी 18004190157 या क्रमांकावर संपर्क साधा. यानंतर यामधील अदर कॉल (Other Call) चा ऑप्शन निवडून थेट कॉल सेंटरशी संपर्क साधा. त्यांना आपल्याकडील बँकेसंदर्भातील योग्य माहिती द्या आणि आपलं गुगल पे आणि फोन पे किंवा पेटीएम अकाऊंट बंद करा.
याव्यतिरिक्त www.android.com/find या वेबसाईटवर जाऊन तिथे देण्यात आलेल्या इरेज डिव्हाइस (Erase Device) या पर्यायावर क्लिक करा आणि आपले सर्व अकाऊंट मोबाईलमधून बंद करा.यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान टळू शकेल.