कोल्हापूरात बूस्टर डोसचा फज्जा:पोलीस,आरोग्य कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशनच होत नसल्याने रखडले लसीकरण

कोल्हापूर:- देशात मोठ्या प्रमाणात कोरोना विरोधी लसीकरणाला सुरुवात झाली आहे.अश्यातच १०० कोटीहून अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस पूर्ण केला आहे. सरकारी आरोग्य यंत्रणा देशवासियांचं लसीकरण जलद पद्धतीने पार पडावं यासाठी मेहनत घेताना दिसत आहे.
दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणि देशावर आलेलं ओमायक्रॉनचं संकट पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ तारखेला आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यासाठी बूस्टर डोसची घोषणा केली.या घोषणेनुसार आजपासून देशात बूस्टर डोस देण्याची मोहीम सर्व आरोग्य यंत्रणांनी हाती घेतली आहे.
यानुसार आजपासून संपूर्ण भारतामध्ये बूस्टर डोस फ्रन्टलाइन वर्कर्सला देण्यात येत आहे. हे सर्व सुरळीत सुरू असताना कोल्हापूरात मात्र बूस्टर डोसचा फज्जा उडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बूस्टर डोसच्या पहिल्याच दिवशी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं रजिस्ट्रेशन होत नसल्याने लसीकरण रखडल्याचं समोर आलं आहे.यासर्वांनंतर संबंधित कोल्हापूर आरोग्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमार्फत लवकरच लसीकरण मोहीम पूर्वरत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.