ब्रेकिंग
कोरोनाचा मुंबईसह महाराष्ट्रातून काढता पाय..

मुंबई :- राज्यात कोरोना रुग्णसंख्या अखेर उतरणीला लागली आहे. आज राज्यात कोरोना रुग्ण संख्येत दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. आज राज्यात कोरोनाचे ६ हजार ४३६ नवे रुग्ण आढळले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात १८ हजार ४२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तर दुसरीकडे राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १७०१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईत दिलासदायक चित्र:-
मुंबईमध्ये ३५६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोना दुपटीचा दर ७६० दिवासांवर आला आहे.तर मुंबईतील रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून ९८ टक्के इतका झाला आहे.