कोंकणदेशविदेशमहाराष्ट्रमुंबई
जपानमधील आंतरराष्ट्रीय उदयोग परिषदेचे उद्घाटन संपन्न, सामंत यांची उपस्थिती

मुंबई : जपानच्या ओसाका शहरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद व प्रदर्शनात (The International Industry Conference and Expo) महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन काल रविवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी पार पडले. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ५ ट्रीलियनची आर्थिक व्यवस्था बनेल, देशाच्या आर्थिक घोडदौडीमध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र राज्य स्वतः १ ट्रीलियन अर्थव्यवस्था बनवून देशात सर्वाधिक बलाढ्य राज्य असल्याचं मतं उदय सामंत ह्यांनी व्यक्त केलं. आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत १५० हून अधिक देश सहभागी झाले असून जागतिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरणार आहे.