लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात गोंधळ; ५ प्रवासी, २ केबिन क्रू अचानक झाले अस्वस्थ!

मुंबई : एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लंडनहून मुंबईत येणा-या विमानातील पाच प्रवासी, दोन केबिन क्रू अस्वस्थ होऊन चक्कर आल्याचे घटना घडली आहे. मुंबईत या विमानाचे लँडिंग झाले. या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे दुर्घचनाग्रस्त विमान एअर इंडियाचे होते. यानंतर एअर इंडियाच्या विमानांच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत.
AI130 हे विमान लंडन हीओहून मुंबईला येत होते. या प्रवासा दरम्यान विमानात पाच प्रवाशांनी आणि दोन कर्मचान्यांनी उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चक्कर येणे आणि मळमळ होणे अशी तक्रार नोंदवली. मुंबई विमानतळावर या प्रकाराची माहिती देण्यात देण्यात आली. मुंबई विमानतळावर AI130 या विमानाचे सुरक्षित लैंडिग करण्यात आले. विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरल्यानंतर वैद्यकीय पथक तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी सज्ज होते अशी माहिती मुंबई विमानतळ मॅनेजमेंटकडून देण्यात आली.
विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर दोन प्रवाशांना आणि दोन केबिन क्रू, ज्यांना अजूनही अस्वस्थ वाटत होते, त्यांना पुढील तपासणीसाठी वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आम्ही घटनेची चौकशी करत आहोत आणि नियामकाला योग्यरित्या कळवले आहे.” एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी सांगितले. प्रवासी तसेच क्रू मेंबर यांना हा त्रास नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.