महाराष्ट्र

कोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; ‘हे’ आहेत फायदे!

पुदिनाच्या पानांच्या स्वादाला तोड नाही. जेवणात पुदिनाची पाने वापरली की आपले तन-मन सारे काही फ्रेश होऊन जाते. गरमीच्या दिवसांत पुदिनाची चटणी मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. पुदिनाच्या पानांमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. यात प्रोटीन आणि गूड फॅटही असतात. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्सच्या पुरेशा प्रमाणामुळे शरीर आरोग्यदायी राखण्याबरोबरच त्वचा मऊ राहते. त्वचेला अनोखी चकाकी येते. 

पुदिनाचे बरेच फायदे आहेत, ते जाणून घेतल्यास तुम्हीही जेवणात पुदिनाचा वापर सुरू कराल आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंदही घ्याल. आरोग्याच्या दृष्टीने पुदिना किती लाभदायी आहे, याबाबत देशातील आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुदिना रक्ताच्या पीएचला अ‍ॅसिडिक होऊ देत नाही. त्यामुळे क्लोटींगच्या समस्येपासूनही आपला बचाव होतो.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात इम्युनिटी वाढवण्याची प्रचंड गरज व्यक्त होत आहे. पुदिनामध्ये हा एक मोठा गुणधर्म आहे. पुदिना आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. कारण पुदिन्याला आयरन, पोटॅशियम आणि मँगनीजचा चांगला स्त्रोत मानला जातो. यामुळे आपली स्मृती वाढते तसेच हिमोग्लोबिनच्या पातळीतसुद्धा सुधारणा होते.

पुदिनामुळे जेवलेले चांगल्या पद्धतीने पचते अर्थात पचन व्यवस्था सुस्थितीत राहते. एक चांगला मेटाबॉलिज्म वजन कमी करण्यास मदत करतो. अशा परिस्थितीत पुदिन्याची चटणी खूप उपयोगी ठरते.

तोंडाचे आरोग्य उत्तम राहते

पुदिनामुळे तोंडाचे आरोग्य उत्तम राहते. अर्थात पुदिना तोंडाच्या आतील भागात बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. याशिवाय दातांवरील डाग साफ करण्यास पुदिनाची मदत होते. तसेच जीभ आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते. पुदिनाची पाने चावत राहिल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.

मांसपेशीच्या वेदनांपासून दिलासा

जर तुम्हाला मांसपेशीमध्ये वेदना होत असतील तर पुदिन्याची चटणी अवश्य खा, आपल्या डायटमध्ये पुदिनाच्या चटणीचा समावेश करा. याशिवाय सामान्य डोकेदुखीपासूनही पुदिनामुळे दिलासा मिळतो. पुदिनाचे तेज आणि ताजा स्वाद डोकेदुखी कमी करण्यास मोठी मदत करू शकतो.

सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो

पुदिन्यामुळे नाक, गळा आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यास मदत होते. पुदिन्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. याच गुणधर्मामुळे पुदिनाचे सेवन केल्यानंतर अगदी खूप वर्षांपासून त्रास देत असलेल्या खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यामुळे गळ्यात होणारी जळजळ थांबते. परिणामी, फुफ्फुस स्वस्थ राहते.

इम्युनिटी वाढवण्यास उपयोगी

सध्याच्या कोरोना काळात संसर्ग रोखण्यासाठी शरीरात स्ट्रॉंग इम्युनिटी पॉवर असण्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर पुदिन्याची चटणी अवश्य आहारात अंतर्भूत करा. पुदिन्याची चटणी खाऊन तुम्ही प्रतिकारशक्ती वाढवाल, त्यामुळे तुमच्या शरीरातील विविध प्रकारच्या व्याधी दूर पळतील. 

वजन कमी करण्यास अत्यंत उपयुक्त

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर पुदिन्याचे सेवन अवश्य करा. कारण वजन नियंत्रित करण्यास पुदिना अत्यंत उपयुक्त असल्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!