ओमायक्रोनशी लढण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

मुंबई:- सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांचीच डोकेदुखी वाढली आहे. तो व्हेरिएंट म्हणजे ओमायक्रोन. या ओमायक्रोनशी लढण्यासाठी आपली शारीरिक क्षमता तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. आणि शारीरिक क्षमता तंदुरुस्त करण्यासाठी आपल्या आहारात बऱ्याच गोष्टी समाविष्ट करण्याची आता वेळ आली आहे. पुढील गोष्टी आपण आहारात समाविष्ट केल्या तर नक्कीच आपली शारीरिक क्षमता वाढू शकते आणि आपण उत्तम रोगप्रतिकारक क्षमतेने ओमायक्रोनला सामोरे जाऊ शकतो.
१.हळद:- हळदीचा समावेश स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या बऱ्याच पदार्थांमध्ये केला जातो. हळद ही दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे अनेक रोगांवर प्रभावी ठरते. तसंच हळदीमुळे रोगप्रतिकारक क्षमता ही वाढीस लागते. त्यामुळेच हळद दुधात टाकून पियाल्यास आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते.
२. बदाम:- सर्दी खोकल्याशी लढण्याकरिता शरीरात ई जीवनसत्व असणे गरजेचे आहे. बदामामध्ये हे ई जीवनसत्व असते.याचसोबतच अँटीऑक्सिडेंट आणि हेल्दी फॅट देखील असतात. त्यामुळे बदाम ही आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
३. मासे,चिकन:- चिकन खाल्ल्यामुळे शरीरातील निरोगी लालरक्त पेशी जलदरित्या तयार व्हायला मदत होते. चिकनमध्ये आढळणारे पोषक घटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. याचसोबत माशांमधील गुणधर्मांमुळे आपल्या शरीराला आजारापासून लढण्यास बळ मिळते.
या तीन गोष्टींचा जर आपण आपल्या खाण्यामध्ये समावेश केला तर नक्कीच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. आणि ओमायक्रॉनचा धोका कमी होऊ शकतो. दरम्यान हे सर्व जरी असलं तरी मास्कचा वापर,सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्त्वाचे आहे.