दूध,अंडी,मटण यापेक्षाही जास्त प्रोटीन मिळेल ’या’पदार्थाच्या सेवनाने..

कोरोना संकटामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज कळली आहे. त्यामुळे आपण आहाराकडेही तितकेच गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्या पदार्थांपासून आपल्या शरीरातील विविध व्याधी दूर होतील. सोयाबीनचा वापरदेखील यापैकीच एक उपाय म्हणून विचारात घ्या आणि तुमच्या आहारामध्ये सोयाबीनचा अंतर्भाव करा. सोयाबिनमुळे तुम्ही विविध व्याधींना दूर लोटू शकाल. तुम्हाला अंडे, दुध आणि मटण खाऊन जेवढे प्रोटीन्स मिळतात, त्याच्यापेक्षाही अधिक प्रोटीन्स सोयाबीनपासून मिळतात.
सोयाबिनमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ई, मिनरल्स आणि एमिनो अॅसिड पुरेशा प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विविध गरजांची पूर्तता होते, तसेच अनेक गंभीर व्याधी दूर होतात. शारीरिक विकास, त्वचेशी संबंधित समस्या आणि केसांची समस्यादेखील सोयाबीनचे सेवन केल्यामुळे दूर होऊ शकेल.
सोयाबीन खाण्याचे फायदे
कर्करोगापासून संरक्षण करते
कर्करोग हा दुर्धर आजार मानला जातो. त्यावर प्रभावी औषध नसल्याने कर्करोगाची चिंता संपलेली नाह. मात्र सोयाबीन या चिंतेवर एक प्रभावी उपाय असेल. सोयाबीनचे सेवन करून तुम्ही कर्करोगासारख्या दुर्धर आजारापासून स्वत:चे रक्षण करू शकाल. सोयाबीनमधील फायबर कंटेट कोलोन कर्करोगाचा धोका कमी करण्यास खूप उपयुक्त ठरतात.
हाडे मजबूत होतात
सोयाबीनचे सेवन केल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. सोयाबीनमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नीशियम, कॉपर, सेलेनियम आणि जिंकसुद्धा पुरेशा प्रमाणात असतात. ही सर्व पोषक तत्त्वे शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण योगदान देतात.
मधुमेहामध्ये फायदेशीर
सध्याच्या घडीला मधुमेह हा आजार सर्वांची काळजी वाढवणारा आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला मधुमेहाचा त्रास रोखण्यासाठी सोयाबीनचे सेवन करणे आवश्यक आहे. सोयाबीनमधील प्रोटीन ग्लुकोजला नियंत्रित करतात आणि इन्सुलिनमध्ये येणारा अडथळा कमी करू शकतात.
मानसिक संतुलन ठीक ठेवते
आजच्या घडीला लोक अनेक ताणतणावांचा सामना करताहेत. रोज तणावाच्या गोष्टींचा विचार करून मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. हे मानसिक आजार आपण रोखू शकतो. अर्थात आपले मानसिक संतुलन ठीक ठेवण्यासाठी आपण सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. सोयाबीन मानसिक संतुलन ठीक करून बुद्धीला चालना देते.