राज्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ,वाचा आजचा आकडा

मुंबई :- राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ४६ हजार १९७ नव्या रुग्णांची भर झाली असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५२,०२५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.काल राज्यात कोरोनाच्या ४३ हजार ६९७ रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे
राज्यात आज १२५ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत २१९९ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ११३३ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती-
आज मुंबईत ५७०८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ हजार ४४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत मुंबईत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 96 टक्के इतका आहे.






