ब्रेकिंग
असदुद्दीन ओवेसींची सुरक्षा वाढवली ; आता CRPF देणार Z श्रेणीची सुरक्षा

नवी दिल्ली:- काल मेरठमधून दिल्लीच्या दिशेने रवाना होत असताना ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर अज्ञात तरूणांनी गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. याप्रकरणी सचिन आणि शुभम अशी नावं असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत भारत सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. माध्यमातील माहितीनुसार ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मात्र,या हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस करत आहेत.