खोकला की साडेतीन लाखाला ठोकला. त्यामुळे काही जण खोकला दाबून मेले -इंदुरीकर महाराज
कोरोनाकाळात सराव नसल्याने 40 टक्के कीर्तनकार हरिपाठ विसरले...

नाशिक :वादग्रस्त किर्तनामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्याइंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
ईगतपुरी तालुक्यातील घोटीमध्ये सोमवारी पार पडलेला त्यांचा किर्तनात ते म्हणाले की, तुम्ही आणि मी नशीबवान आहोत की, दुसऱ्या लाटेतून वाचलो. आता हा आपला पुनर्जन्म आहे. एकतर दीड वर्षातून आज तुम्ही आम्ही हसलो. देवाने २०२० साली जीआर काढला. खोकला की साडेतीन लाखाला ठोकला. त्यामुळे काही जण खोकला दाबून मेले पण खोकले नाही, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले.
हॉस्पिटल विकत घेणारे गेले. जर यमाने लाच घेतली असती तर या नालायकांनी खालून वर चेक पाठवला असता आणि म्हातारा खाली घेतला असता अशी टीका देखील डॉक्टरांवर केली.कोरोनाकाळात सराव नसल्याने 40 टक्के कीर्तनकार हरिपाठ विसरले. उतपन्नच नाही तर हरिपाठ काय करणार आहे. ४० टक्के माळकऱ्यांनी माळा काढल्या. कोणीतरी अंडी खाल्ली की कोरोना होत नाही असे सांगितल्यावर सर्वांनी अंड्यावर उड्या मारल्या. ते माळ काढत नव्हते पण बायको म्हणायची की माळ काढा तुम्ही गेल्यावर आम्ही कोणाकडे पाहावं. कोणीतरी म्हणे काढा प्यायला की कोरोना होत नाही. चहा, दूध सोडून काढा प्यायला लागली मंडळी आणि नुसती आग निघायला लागली.