मुंबई

गोव्यात २४ जानेवारीला आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन

मुंबई – संस्कृत भारती या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाबरोबरच जगभरातील तरूणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असणा-या युट्युब रिल्स/ युट्युब शाॅर्ट्स’ची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा संस्कृत भाषेत असून हा महोत्सव २४ जानेवारी २०२५ रोजी गोव्यामध्ये होणार आहे. या दोन्ही स्पर्धांचा निकाल आणि पारितोषिक वितरण त्याच दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी होईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा शेवटचा दिवस ५ नोव्हेंबर २०२४ आहे. अधिक माहितीसाठी संस्कृत भारतीच्या www.samskritsbharat.in वेबसाईटला अवश्य भेट द्या. या विषयासंदर्भात शंकानिरसनासाठी संपर्क – 9769545758. यानिमित्ताने सर्वांनी संस्कृतमध्ये लघुचित्रपट तसेच युट्युब रिल्स/ युट्युब शाॅर्ट्स निर्माण करुन या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संस्कृतभाषा ही समाजातील संवादाची माध्यमभाषा व्हावी म्हणून संस्कृत भारती ही संस्था १९८१ पासून कार्यरत आहे. ह्याच कार्याचा एक भाग म्हणून संस्कृत भारतीने सहा वर्षांपूर्वी जगातील आबालवृध्दांना भुरळ घालणा-या दृकश्राव्य माध्यमाची निवड केली आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत लघुचित्रपट महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन सुरु केले. ह्या लघुचित्रपट महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक कलाकारांबरोबरच हौशी कलाकारही ह्यात सहभागी होऊ शकतात. अट फक्त एकच – लघुचित्रपटातील संवादाची भाषा संस्कृत असावी. या महोत्सवाच्या निमित्ताने संस्कृत लघुचित्रपटांची स्पर्धा घेतली जाऊन त्यात उत्कृष्ट लघुचित्रपटाबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शक, कलाकार, संगीत इत्यादि विविध प्रकारची पारितोषिके देण्यात येतात. जगभरातुन या महोत्सवासाठी संस्कृत लघुचित्रपटांची नोंदणी होत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!