महाराष्ट्रकोंकणमुंबईशैक्षणिक

दहावीचा निकाल जाहीर! राज्याचा निकाल 94.10%; कोकण विभाग अव्वल, मुलींनी पुन्हा बाजी मारली

मुंबई : इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर आज (दि.13) संपली असून, बोर्डाकडून विभागवार निकालची माहिती देण्यात आली. यावेळीदेखील मुलींनीच बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली असून, राज्याचा एकूण निकाल 94.10 टक्के लागला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची टक्केवारी १.७१ टक्क्याने कमी झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (10th Result) अध्यक्ष शरद गोसावी यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला. दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना निकाल पाहता येणार आहे.

विभागवार निकाल खालीलप्रमाणे:
– कोकण : ९८-८२ टक्के
– कोल्हापूर : ९६.८७ टक्के
– मुंबई : ९५.८४ टक्के
– पुणे: ९४.८१ टक्के
– नाशिक : ९३.४ टक्के – अमरावती : ९२.९५ टक्के
– छ. संभाजी नगर : ९२.८२ टक्के
– लातूर : ९२.७७ टक्के
-नागपूर : ९९.७८ टक्के
यंदाही राज्यात मुलीच आघाडीवर

यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला असून, कोकण विभागाने पहिल्या नंबरवर असून, कोकणाचा निकाल ९८.८२ टक्के लागला आहे. तर, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका लागला असून, यंदाही राज्यात मुलींनीच बाजी मारली आहे. यात मुलींचा निकाल 96.14 टक्के तर, मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे.
कुठे पाहाल निकाल?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो करा
१. सगळ्यात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाइटवर जा.
२. वेबसाइटच्या होमपेजवर, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२५ लिंकवर क्लिक करा.
३. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्ही तुमचे लॉगिन डिटेल्स (नाव, हॉल तिकीट क्रमांक) भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
४. यामुळे तुम्ही तुमचा निकाल ऑनलाईन पाहू शकता.
. सगळी माहिती बरोबर आहेत का ते तपासा.
६. निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं
दुपारी 1 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे. दहावीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!