कोंकण

मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल

चिपळूण – कोकणात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. मुंबई- गोवा महामार्गा पाण्यात बुडाला आहे. चिपळूणमध्ये मुंबई- गोवा महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावरील एक लेक पूर्णतः पाण्याखाली गेली आहे.

चिपळूणच्या विविध सखल भागामध्ये पाणी साचले आहे. चिपळूण मध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे महामार्गावर पाणीच पाणी झाले आहे. रविवारी रात्रीपासूनच कोसळणाऱ्या संत दर पावसामुळे खेड शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, मुंबई गोवा महामार्ग देखील बंद झाला आहे महामार्गावरील बोरघर बस स्टॉप येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरीही काही वाहन चालक धाडस करून स्वतःचा इतरांचा जीव धोक्यात घालून या पाण्यातून वाहने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असताना पहावयास मिळत आहे.

महामार्ग लगत असणाऱ्या नदीने सकाळपासूनच रौद्ररूप धारण केले होते यामुळे महामार्ग शेजारील असणाऱ्या गावांमध्ये जाणारे बरेचसे फुल सकाळपासूनच पाण्याखाली गेलेले पाहावयास मिळत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्ग देखील पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीमध्ये सध्या दरड किंवा रस्ता खचण्याच्या घटना घडतायेत….जोरदार पावसामुळे खेडच्य़ा शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता एका ठिकाणी खचून तो पूर्ण वाहून गेलाय… त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झालीये. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड भिंगळोली एसटी डेपो ते शासकिय रेस्टहाऊसच्या रस्त्यावर पुराचं पाणी शिरलंय. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत मार्ग काढावा लागतोय. कोकणात मुसळधार पाऊस सुरूये. त्यामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!