महाराष्ट्रमुंबई
पत्रकार दिनानिमित्ताने दिंडोशी येथे सकल मराठा समाज व अन्य संघटनां कडून पत्रकारांचा सत्कार
प्रतिनिधी : पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिंडोशी येथील सकल मराठा समाज, ज्येष्ठ नागरिक संघ आणि अखिल भारतीय मराठा समाज गोरेगाव यांच्या वतीने विभागातील वरिष्ठ पत्रकार, संपादक आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकारांचा दिंडोशी येथे हृद्य सत्कार करण्यात आला.
या मध्ये गोरेगाव मिरर व मिरर महाराष्ट्र चे संपादक महेश पावसकर, सुनील गडकर, अनंतराव मोगा, सकाळ चे चंद्रकांत जाधव,दत्ताराम बिरारी, साप्ताहिक सनसनी चे राजकिरण साळवी, महेंद्र जाधव, आर पी न्यूज चॅनेल चे राजेश पांडे, सचिन गायकवाड, तसेच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे महादेव पवार आणि विनायक बारशिंगे यांचा शाल आणि तुळशी चे रोप देऊन सत्कार करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अनंत दत्ताराम मोरे, नीलकंठ राणे, अनिल चितळे, मंगेश बनसोडे आणि दीपक रत्नागिरीकर यांनी केले..