मोठी बातमी! कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवा स्कार्फ वाद पेटला,कर्नाटकातील शाळा-कॉलेजेस ३ दिवसांसाठी बंद ठेवण्याचे कर्नाटक सरकारचे आदेश

कर्नाटक:- कर्नाटकात हिजाब विरुद्ध भगवा स्कार्फ वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे.याच अनुषंगाने कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये ३ दिवसांसाठी बंद करण्यात आलेल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांनी हे आदेश दिलेले आहेत.
कर्नाटकमधील महाविद्यालयात हिजाब विरुद्ध भगवा स्कार्फ असा वाद काही दिवसांपासून रंगला आहे.या वादात अनेक तरुण-तरुणी सहभागी झाल्या असून सध्या सर्व महाविद्यालयात भगवा स्कार्फ विरुद्ध हिजाब हा संघर्ष पाहायला मिळत आहे.या वादामुळे काही तरुणांनी तिरंग्याच्या जागी भगवा फडकवल्याचं देखील पाहायला मिळालं. कर्नाटकातील प्रत्येक महाविद्यालयात हे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान हे तणावपूर्ण वातावरण पाहता कर्नाटक सरकारने पुढील ३ दिवस शाळा आणि महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.जातीय आणि धार्मिक तेढ वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच कर्नाटकातील शिमोगा या भागात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.४ पेक्षा जास्त जणांना या भागात एकत्र येता येणार नाहीये.दरम्यान मागच्या अनेक दिवसांपासून हा वाद रंगल्याचं पाहायला मिळत आहे.