क्राइमब्रेकिंग

Breaking-गुणवंत सदावर्ते यांचा जामीन अर्ज फेटाळला;२ दिवसांची पोलीस कोठडी तर ईतर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी

मुंबई:राष्ट्रवादीचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी काल अटक केलेले एसटी कामगारांचे नेते गुणवंत सदावर्ते यांना आज किल्ला कोर्टात हजर केले असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे तर ईतर १०९ आरोपींना  न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

 न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वरील आदेश पारित केले.

सदावर्ते यांच्याबाजूने अॅड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला.तर  १०९  एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्या
पेडर रोड जवळील सिल्व्हर ओक या निवासस्थानासमोर दगडफेक, चप्पलफेक व  निदर्शने केली होती. त्यानंतर रात्री उशिरा एसटी कर्मचाऱ्यांचे नेते ॲड  गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आज सकाळी त्यांना किल्ला  कोर्टात हजर करण्यात आले.

सदावर्ते यांना कोर्टात आणण्यात येणार असल्याने कोर्टाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात
आला होता. या परिसरात इतरांना प्रवेश मज्जाव करण्यात आला होता. तसेच मोबाईल नेण्यासही बंदी घालण्यात आली होती.

कोर्टात तिन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद
करण्यात आला. सुमारे तीन तास हा युक्तिवाद झाला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बाजूने अॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली.
तर सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!