उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कन्येच्या लघुपटाला आंतरराष्ट्रीय नामांकन
पदार्पणातच मिळविले १५ पुरस्कार…

मुंबई:सिंधुदुर्ग चे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची कन्या किर्ती सामंत हिने अभिनय केलेल्या आज्जू या मराठी लघुपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये नामांकने मिळाली आहेत.
आतापर्यंत कीर्ती ला १५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे. हे यश मिळविणारी किर्ती ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची सुकन्या आहे.
मेनिका नातूज चित्रांगण मुंबई निर्मित व ऍड. सौ. जया उदय सामंत यांच्या सहकार्यातून आज्जू हा मराठी लघुचित्रपट नुकताच फेस्टिवलसाठी प्रदर्शित केला आहे. पिकुली या महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे लेखक नंदा आचरेकर, दिग्दर्शक मनोज नार्वेकर आणि संकलक विजय खोचीकर हे एकत्र आल आहेत. ज्येष्ठ अभिनेते प्रफुल्ल सामंत यांनी आजोबाची तर नंदिनी उर्फ नंदा या नातीची भूमिका रत्नागिरीची कन्या कु. किर्ती उदय सामंत हिने साकारली आहे. किर्तीला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने तिचे इन्स्टाग्रामवर अपलोड केलेले व्हिडिओ पाहून निर्माते नंदा आचरेकर यांनी तिची या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड केली होती. आतापर्यंत किर्तीला १५ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.