गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे नियमावलीकडे लागले डोळे?

मुबई: गणेशोत्सव सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने आणि कोकण रेल्वेने जादा गाड्यांची सोय केल्यावर आता राज्य शासन गणपती सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली कधी जाहीर करणार ?या कडे चाकरमान्यांचे डोळे लागले आहेत.
या वर्षी 10 सप्टेंबर रोजी गणपतीचा सण आहे. गौरी -गणपतीच्या सणाचे वेड साऱ्या कोकणी माणसाला आहे.मुंबईतले चाकरमानी ट्रेन आणि एसट्या भरभरून मुलखात उतरतात.त्या दिवसात चाकरमान्यानी गाव फुलतात.
गत वर्षी कोरोनाची भीती मनात होती.तसेच निर्बंध कडक होते.त्यामुळे लोक मोठ्या संख्येने गावी गेले नाहीत.गावच्या भावाकडून गणपती उत्सव साजरा करून घेतला होता.परंतू यावेळी मुबई आणि लगतच्या शहरात कोरोना आटोक्यात आल्याने लाखो चाकरमानी गणेशोत्सवाला गावी जाणार असल्याच्या अंदाज आहे .सर्व गाड्यांची आरक्षणे फुल झाली आहेत.
राज्यशासनची कोविड 19 ची नियमावली लवकर जाहीर झाली असती तर नियोजन करता आलं असत.परंतू ती न झाल्याने चाकरमान्यांत नाराजी व्यक्त आहे.
कोकणातील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.लाट अदयाप ओसरलेली नाही.पुढे तिसरी लाट येण्याचा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त आहे.या पार्श्वभूमीवर नियमावली कधी जाहीर होणार ?असा सवाल व्यक्त होत आहे.