महाराष्ट्र

गान कोकीळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई- गानकोकिळा  लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ९२ वर्षीय लता मंगेशकर यांना मंगळवारी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सध्या ब्रीच कॅण्डीमधील आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती अशी माहिती मिळत आहे.

लता मंगेशकरांना आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचं सांगितलं होतं.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ‘लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना सौम्य लक्षणं असून ऑक्सिजनची गरज भासणार नाही. त्या आपल्या घरी विलगीकरणात किंवा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात थांबून उपचार घेऊ शकतात’.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!