ब्रेकिंग

कारच्या बॉनेटमध्ये चक्क निघाला नाग ! वाहन धारकाची वळली बोबडी…

दापोली- खेड तालुक्यातील सुखदर या गावातून खेड शहरात यायला निघालेल्या कारच्या बॉनेटमध्ये चक्क नाग निघाल्याने प्रवासाची चांगलीच धांदल उडाली. कारच्या बॉनेटमध्ये लपून बसलेल्या या नागाला सर्पमित्रांनी शिताफीने पकडून जंगलात सोडून दिले.

खेड तालुक्यातील सुखदर येथील दीपक घाडगे हे आपली चारचाकी घेऊन खेड येथे यायला निघाले होते. कारच्या रेडिएटरमध्ये पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी कारचा बॉनेट उघडला असता त्यांना कारच्या बॉनेटमध्ये नाग बसलेला दिसून आला. बॉनेटमधील नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र घाबरलेला तो नाग इंजिनच्या आतमध्ये कुठेतरी जाऊन बसला.

इंजिनच्या आतमध्ये लपलेल्या नागाला बाहेर काढण्यासाठी घाडगे यांनी बॉनेटमध्ये पाणी मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते आपली चारचाकी घेऊन दापोली-खेड मार्गावरील दस्तुरी येथे असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आले. या ठिकाणी त्यांनी कारची सर्व्हिसिंग करणाऱ्या युवकाला गाडीच्या बॉनेटमध्ये नाग लपला असल्याचे सांगून पाणी मारल्याची विनंती केली.

मात्र, सर्व्हिसिंग करणारा युवकही नागाला घाबरल्यामुळे त्यानेही बॉनेटमध्ये पाणी मारण्यास नकार दिला.घाडगे यांनी खेड येथील सर्पमित्रांशी संपर्क साधून गाडीच्या इंजिनमध्ये नाग दडून बसला असल्याची माहिती. दिली. सर्पमित्र ओंकार शिंदे यांनी दस्तुरी येथे जाऊन गाडीच्या इंजिनमध्ये लपून बसलेल्या नागाला शिताफीने पकडून जंगलात सोडून दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!