मुंबईतील दिंडोशी न्यू म्हाडा वसाहतीत लोकांनी दिवसाढवळ्या अनुभवला बिबट्या चा थरार:पहा व्हिडियो
मुंबई: मुंबई चे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे कॉलनीत बिबट्यांचा मुक्त संचार अनेकांनी पाहिलाय.. मात्र दिंडोशीतील संतोष नगर जवळ असलेल्या न्यू म्हाडा कॉलनीत अलीकडे दिवसाढवळ्या बिबट्या येऊन कुत्र्या मांजरांची शिकार करू लागले आहेत, त्यामुळे या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडाला आहे.
दोन दिवसांपूर्वी न्यू म्हाडा वसाहतीला लागून असलेल्या डोंगरातून एका बिबट्याने दिवसाढवळ्या वसाहतीत येऊन एका कुत्र्याची शिकार केली आणि त्या कुत्र्याला घेऊन येथील जवळपास २० फुटांहून उंच भिंतीवरून चालत जंगलात पलायन केले.
या घटनेचे येथील अनेक नागरिकांनी चित्रण करून समाजमाध्यमातून व्हायरल केले आहे. याच वसाहतीत राहणाऱ्या अभिनेता सिदार्थ चांदेकर याने देखील या बिबट्याचे फोटो काढून आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेयर केले आहेत.
मिरर महाराष्ट्राच्या वाचकांसाठी सदर बिबट्याचा व्हिडियो आम्ही येथे देत सादर करत आहोत.
येथे क्लिक करा
https://youtube.com/shorts/Onu3Vlkvc6k?feature=share