दिंडोशीतील न्यू म्हाडा कॉलनीत पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार: चक्क बंगल्याच्या छतावर मारली उडी!

मुंबई: अलीकडेच भर दिवसा कुत्र्याची शिकार करून गोरेगावातील दिंडोशी येथील न्यू म्हाडा कॉलनीच्या संरक्षक भिंतीवरून चालणाऱ्या बिबट्याचा व्हिडियो समाज माध्यमातून चांगलाच व्हायरल झाला होता.
या नंतर वनविभागातर्फे सर्च ऑपरेशन करून बिबट्याची संभाव्य ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न देखील केला गेला. मात्र त्या नंतर बिबट्याला पकडण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.
शनिवार दि.१४ ऑगस्ट रोजी बिल्डिंग क्रमांक १९ मध्ये रात्री २.३०-ते ३ दरम्यान बिबट्या ने चक्क बिल्डिंग च्या पार्किंग एरियातून फेरी मारून मुख्य गेट मधून बाहेर पडल्याचे चित्रण सीसी टीव्हीत कैद झाले आहे.
हे कमी की काय म्हणून आज १५ ऑगस्ट रोजी रात्री पावणे नऊ च्या सुमारास येथील रॉयल हिल्स सोसायटी मधील 44/B या बंगल्याच्या चक्क गच्चीवर बिबट्या ने उडी मारली.त्यानंतर शेजारीच असलेल्या 44/A ‘आईसाहेब’ या बंगल्याच्या छतावर उडी घेऊन मागील जंगलात पसार झाला. या प्रकाराने भयभीत झालेल्या रहिवाशांनी एकत्र येऊन बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न सुरु केला.
दरम्यान या प्रकारची दखल घेऊन ॲड.डाॅ. निलेश वैजयंती भगवान पावसकर यांनी संचालक वनविभाग यांना तातडीने कळविताच वनविभागातर्फे सर्च टीम पाठविण्यात आली.सदर टीम ने पहाणी केली असता त्यांना वाघाचे ठसे आढळून आले आहेत. दरम्यान सुरक्षिततेसाठी जवळपास असलेल्या सर्व ईमारतींचे गेट बंद करण्यात आहे आहेत.
ईमारत क्रमांक १९ च्या गेट मधून बिबट्या बाहेर पडतानाचा पहा व्हिडियो
पहा- 44/B बंगल्याच्या छतावरील बिबट्याच्या पावलांचे ठसे:-