मुंबईमहाराष्ट्र

पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीचा अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर छापा

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्राच्या सांताक्रुझ येथील घरावर ईडीनं छापा टाकला आहे. याआधी राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. नंतर काही दिवस तुरुंगात काढल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. राज कुंद्राच्या विरोधात आयपीसीच्या ४२० (फसवणूक), ३४ (कॉमन इंटेशन), २९२, २९३ (अश्लिलता पसरवणे), आणि आयटी कायद्याअंतर्गंत कलम ६७ अ अंतर्गंत केस दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याविरोधात न्यायालयात चार हजार पानी आरोपपत्र दाखल केले होते.

राज आणि त्याच्या कंपनीनं अश्लील व्हिडिओ विविध अप्लिकेशन्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्वर शेअर करुन कमावलेला पैसा नंतर परदेशात पाठवण्यात आला होता. ईडीचा तपास मुंबई पोलिसांच्या २०२१च्या प्रकरणावर आधारित आहे. पूर्वी या प्रकरणात शिल्पा शेट्टीचेही नाव पुढे आले होते, मात्र आतापर्यंत तिच्यावर या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला नाही. मनी लॉंड्रिंग आणि पोर्नोग्राफी प्रकरणात ईडीने उत्तर प्रदेशसह १५ जागांवर छापे टाकल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!