
आंध्रप्रदेश- जर बाजारात तुम्ही महागड्या वस्तू कर्जाने घेत असाल तर त्याचे पैसे देणं बंधनकारक असतं. मात्र एखादी छोटी-मोठी वस्तू असेल तर लोक विसरून जातात. आंध्रप्रदेशातील मोहनने अशाच प्रकारे उकडलेल्या शेंगा विकणाऱ्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. तो शेंगा विकणारानंतर विसरून गेला होता. मात्र ११ वर्षांनंतर त्यांनी अमेरिकेहून येऊन आपल्यावरील ऋण फेडलं.
ही कहाणी २०१० मध्ये सुरू झाली होती. मोहन आपला मुलगा प्रणव आणि मुलगी सुचितासह आंध्रप्रदेशात फिरायला आला होता. येथे मोहनने आपल्या मुलांसाठी उकडलेल्या शेंगा खरेदी केल्या. मुलांनी शेंगा खाण्यास सुरुवातही केली. मात्र, जेव्हा पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मोहनच्या लक्षात आलं की, तो पाकीट घरीच विसरला आहे. मात्र, त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते. दुसरं कोणी असतं तर मोहनकडून पैसे घेऊनच गेला असता. मात्र मोहनने पैसे दिले नाहीत आणि त्या शेंगा विकणाऱ्या दादानेही पैसे मागितले नाहीत आणि मोफतच शेंगा दिल्या. मोहनने त्याला सांगितलं की, ‘मी लवकरच तुझे पैसे परत करतो. यावेळी मोहनने शेंगा विकणाऱ्याचा एक फोटोदेखील घेतला. नंतर मात्र मोहन हे विसरून गेला आणि तो अमेरिकेला परतला.
काही पैशांची गोष्ट असते अशावेळी अनेकजण विसरून जातात.मात्र, ११ वर्षांनंतर मोहनची मुलं भारतात परत आली आणि आल्यानंतर भावा-बहिणींनी पहिल्यांदा शेंगा विकणाऱ्या काकांकडे जाण्याचं ठरवलं. मात्र त्याला शोधणं सोपं नव्हतं. यासाठी त्यांनी काकीनाडा शहराच्या आमदारांची मदत घेतली. काकीनाडा शहराचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांनी आपल्या मोबाईलवरुन फेसबुक पोस्ट शेअर केली. त्यांची पोस्ट बघता-बघता व्हायरल झाली. आणि काही लोकांनी आमदारांला शेंगा विकणाऱ्याची माहिती दिली. मात्र त्यांच्या घरी गेल्यावर या भावंडांना समजलं की त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.यावेळी या भावंडांनी त्यांनी शेंगा विकणाऱ्या काकांच्या कुटुंबाला २५ हजार रुपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे ऋण फेडले.