ब्रेकिंग
माथेरानमध्ये फिरायला जाताय? सावधान! इथल्या जंगलात लपलाय बिबट्या
माथेरानच्या जंगलात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तर पर्यटकांना सावधानतेचा इशारा

नेरळ:- पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं आणि मुंबईकरांसाठी जवळच्या जवळ असलेलं दिलासादायक ठिकाण आता बिबट्याच्या सावटाखाली आहे.माथेरानच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलं आहे. सध्या गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट असून वन विभागाने या बिबट्याचा शोध सुरू केला आहे.
तसंच वनविभागाने पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.सध्या वनविभाग माथेरान परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत असून बिबट्याला वन क्षेत्रात सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.
वन विभागामार्फत नाईट व्हिजन आणि अन्य अत्याधुनिक कॅमेरे विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.ज्या स्थानिकांनी बिबट्या पाहिला आहे.त्यांच्या सांगण्यानुसार हे कॅमेरे सेट करण्यात आले आहेत.याच आधारे हे शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.