ब्रेकिंग
समीर वानखेडेंना आणखी एक मोठा झटका! नवी मुंबईतील वानखेडेंच्या सदगुरु फॅमिली रेस्टॉरंट आणि बारचा परवाना रद्द

मुंबई- एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्या सदगुरु फॅमिली रेस्टॉरंट आणि बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून हा परवाना रद्द करण्यात आला आहे.
चुकीची माहिती आणि फसवणूक करून हा परवाना मिळवण्यात आला असल्याचा समीर वानखेडेंवर आरोप करण्यात आला आहे. जन्मतारीखेमध्ये तफावत असल्याने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून हा परवाना रद्द करण्यात आला आहे.
वयाच्या १७ वर्षी स्वतःच्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून समीर वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान यावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे संबंधित कारवाई करण्यात आली आहे.




