देशविदेश

‘या’ कारणासाठी आधार कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्सशी लिंक करणे आवश्यक आहे..

नवी दिल्ली l तुम्ही जर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले असेल तर तुम्हाला आता आणखी एक काम करावे लागणार आहे. ज्या प्रमाणे आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक केले आहे, तशाच पद्धतीने आता ड्रायव्हिंग लायसन्सही आधार कार्डशी जोडणे आवश्यक झाले आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स डुप्लिकेशनच्या प्रकरणांना आळा बसेल आणि मूळ वाहनचालक असलेल्या लोकांना खूप फायदा होईल, असा दावा सरकारने केला आहे. तुम्ही जर आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडण्याचा विचार करत असाल तर ही आहे सर्वात सोपी पध्दत.

आधी तुम्ही हे काम करा

आधार कार्डशी ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्याच्या परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जा. यानंतर तुम्हाला ‘लिंक आधार’च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला ड्रॉप-डाऊनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या पयार्यावर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर विचारला जाईल. तो नंबर याठिकाणी नोंदवा.

ओटीपीमध्ये टाकताच आधार कार्ड लिंक होणार

ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर प्रविष्ट केल्यानंतर अर्थात तेथे नोंदवल्यानंतर तुम्हाला ‘गेट डिटेल्स’ या पयार्यावर क्लिक करावे लागेल. मग तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘सबमिट’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. यानंतर एक ओटीपी एसएमएसद्वारे आपल्या मोबाईल नंबरवर येईल. हा ओटीपी नोंदवल्यानंतर तुमच्या आधार कार्डला ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

परवाना पडताळणीसाठी आधार बंधनकारक

ड्रायव्हिंग लायसन्सच्या पडताळणीसाठी अर्थात सत्यता तपासताना आधार कार्डची गरज भासणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या आरटीओ कार्यालयात जावे लागेल. देशातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ड्रायव्हिंग लासयन्सशी संबंधित सर्व कामे कित्येक दिवसांपासून थांबविण्यात आली होती. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. त्यामुळे आता अनेक राज्यांत ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित कामे पुन्हा सुरू होऊ लागली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!