ऐकावं ते नवलच! रत्नागिरीच्या अवकाशात घडला चमत्कार…. ताऱ्यांची रांग की तबकड्या ? चर्चेला उधाण !

रत्नागिरी:- कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात एक अजब प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीच्या अवकाशात एकामागून एक जाणारी ताऱ्यांची रांग दिसल्याने तेथील स्थानिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
ही घटना २० डिसेंबरच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे.ताऱ्यांसारखी दिसणारी आणि त्याच पद्धतीने लुकलूकणारी गोष्ट अनेकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.अनेकांच्या मते ही गोष्ट परग्रहावरील तबकडी होती, अनेकांच्या मते ही गोष्ट युएफओ होती,अश्या देखील चर्चा इथे रंगताना पाहायला मिळत आहेत.
तज्ज्ञांच्या मते,हे तारे नसून उपग्रह असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे.मात्र,याबाबत ठोस माहिती कोणीही देऊ शकत नाहीये.दरम्यान या अवकाश चमकणाऱ्या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या चर्चा रंगवल्या जात आहेत.