देशविदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

भारताची ऐतिहासीक कामगिरी, इस्त्रोने अंतराळात केले २ उपग्रहांचे डॉकिंग

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) स्पेस डॉकिंग प्रयोगांतर्गत २ उपग्रहांना जोडण्यात यश मिळवले आहे. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत याला ऐतिहासिक क्षण म्हटले आहे. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. इस्रोने ३० डिसेंबर २०२४ रोजी स्पेस डॉकिंग प्रयोग सुरू केला होता. त्यानंतर १२ जानेवारी रोजी डॉकिंग चाचणी दरम्यान, इस्रोने दोन्ही उपग्रहांना 3 मीटरपेक्षा कमी अंतरावर आणले होते आणि त्यांना सुरक्षित अंतरावर परत आणले होते. पीएसएलव्ही सी-६० रॉकेटच्या मदतीने एसडीएक्स-०१ आणि एसडीएक्स-०२ हे दोन छोटे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. 

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले आणि ४७५ किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यात आले. इस्रोच्या मते, स्पॅडेक्स मिशन हे पीएसएलव्हीने प्रक्षेपित केलेल्या २ लहान अंतराळयानांचा वापर करून अवकाशात डॉकिंग दाखविण्यासाठी एक किफायतशीर तंत्रज्ञान मिशन आहे. अंतराळात, एकाच मोहिमेसाठी अनेक रॉकेट प्रक्षेपणांची आवश्यकता असते तेव्हा डॉकिंग तंत्रज्ञान आवश्यक असते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मिडीयावर पंतप्रधानांनी जारी केलेल्या संदेशात म्हंटले की, ‘उपग्रहांच्या अंतराळ डॉकिंगच्या यशस्वी प्रात्यक्षिकासाठी आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि संपूर्ण अंतराळ बंधुत्वाचे अभिनंदन.’ येत्या काळात भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!