मुंबई,दि.२७: संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता १ जून नंतर महाराष्ट्रात सरसकट लॉकडाऊन उठणार नाही अशा स्पष्ट शब्दात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या २ महिन्यांपासून राज्यात हळूहळू लॉकडाऊन करण्यात आला आहे. मुंबईत जरी कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्व्भूमीवर राज्यात लॉकडाऊन उठविण्यात येणार नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे निर्बंध कमी होतील का या प्रश्नावर टोपे यांनी या बाबतीत राज्यातील टास्क फोर्स शी बोलून निर्णय घेण्यात येतील असे सांगितले