“पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद” शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

बारामती – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षीं बारामती येथे दीपावली पाडव्यानिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवारांच्या दुसऱ्या पाडव्यावरुन नाराजी व्यक्त केली. शिवाय आर. आर. पाटलांविषयी अजित पवारांनी केलेल्या विधानावरुन प्रतिक्रिया दिली. यासह निवडणुकीमध्ये पोलिस गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद मिळत असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला.
शरद पवार म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आजचा दिवस आनंदाचा असतो. महारष्ट्रातील जनतेला चांगले दिवस यावेत, त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, हेच मागणं आहे. महाराष्ट्रतील आजच्या स्थितीची चिंता वाटते, परिस्थिती हाताळण्यास आजच्या सरकारला अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या रॉकेंगमध्ये महाराष्ट्रपहिल्याच पाच राज्यात नाहीं. उत्पादनात महाराष्ट्रमागे गेला आहे “सर्वांच्या सामूहिक प्रयल्नाने आपण चित्र बदलू शकतो. परीवर्तन घडबू शकतो.. राज्यातील जनतेला सुविधा देण्याच्या योजना या सरकारने बंद केल्याचं चित्र आहे.
या योजनांचे निधी इतरत्र वळवला जातोय.” असंही पवार म्हणाले. “आर.आर. पाटलांबद्दलच्या विधानावर पवार म्हणाले.. “सिंचन घोटाळ्याचा विषय आम्ही काढला नाही. आर.आर. पाटील यांची प्रतिमा चांगली होती. स्वच्छ होती. त्यांच्याबद्दल असं बोललं गेलं हे योग्य नाही. ते घडलं नसतं चागलं झालं असतं. सिंचन घोटाळ्याची माहिती अजित पवार यांना फडणवीस यांनी दाखवली, त्यात काही चुकीचं नाही असं फडणवीस म्हणतात. पण त्यांनी घेतलेल्या गुप्ततेचा शपथेचा तो भंग आहे.” असं शरद पवार म्हणाले “महायुतीच्या उमेदवारांना रसद..”शरद पवार म्हणाले की, या सरकारचं वैशिष्य आहे. विमानाने एबी फॉर्म पाठवले पोलीस दलाच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद पुरवली जात आहे. हे मी जाहीरपणे सांगणार होतो. मात्र, माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे नाव जाहीर करु नये, अशी गळ घातली आहे.