कोंकणमहाराष्ट्रमुंबई
दीपावली सुट्टीच्या हंगामासाठी एलटीटी-सावंतवाडी दिवाळी स्पेशल धावणार उद्यापासून

सावंतवाडी : दीपावली सुट्टी हंगामासाठी कोकण मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली दिवाळी एलटीटी-सावंतवाडी स्पेशल १७ ऑक्टोबरपासून धावणार आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत धावणाऱ्या स्पेशलमुळे सुट्टी हंगामात गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.
०११७९/०११८० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी धावेल. एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहोचेल.
२२ एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.