मुंबई-मडगांव वंदे भारत एक्सप्रेस ला उद्घाटना चा मुहूर्त अखेर गावला…
उद्या मंगळवार 27 जून पासून भारतात 5 नवीन वंदे भारत एक्स्प्रेस होणार सुरू

मुंबई,दि.26 (प्रतिनिधी) मुंबई-मडगांव-मुंबई या कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस च्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर नक्की झाला असून उद्या मंगळवार दिनांक २७ जून रोजी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळमधून व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे या रेल्वेचे झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत, त्यासाठी गोवा -मडगांव येथे रेल्वे प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी सुरू केली आहे.
ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातानंतर गोवा-मडगांव येथील नियोजित वंदे भारतच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.आता मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यासाठी गोवा-मडगांव जंक्शन येथे रेल्वे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे.
सद्यस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या प्रिमियम ट्रेन मधून ३ ट्रेन थांबत आहेत,त्यात राजधानी एक्सप्रेस सावंतवाडी येथे आणि तेजस एक्सप्रेस कुडाळ येथे थांबत आहे. आता कणकवली येथे वंदे भारत ही ट्रेन थांबणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रकानुसार वंदे भारत एक्सस्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर सध्या आठवड्यातील ३ दिवस धावणार आहे. पावसाळी वेळापत्रक संपल्यानंतर मात्र ही गाडी शुक्रवार वगळून आठवड्यातील ६ दिवस धावणार आहे.
एकूण पाच वंदे भारत एक्सप्रेस ना पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा
1)राणी कमलापती (भोपाळ)-इंदौर वंदे भारत एक्सप्रेस
2)भोपाळ-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस
3)रांची-पटणा वंदे भारत एक्सप्रेस
4)धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
5)गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मडगाव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस





