राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट,वाचा आजची रूग्णसंख्या

मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत आज कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळालं. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ११ हजार ३९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या २४ तासात २१ हजार ६६७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
तर दुसरीकडे राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत ३३३४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी १७०१ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मुंबईतील कोरोना परिस्थिती:-
मागील काही दिवसांच्या तुलनेत आज मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. शनिवारी मुंबईत ६४३ कोरोना रुग्ण आढळले आहेत मागील काही दिवसांच्या तुलनेत ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत ६४३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर १ हजार ४०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रिकव्हरी रेट ९८ टक्के इतका झाला आहे.