१३ किलो सोन्याची चोरी फक्त ७२ तासांत उघडकीस! – दहिसर-बोरिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

मुंबई : बोरीवली (प.) येथील फ्लॅटमधून तब्बल ₹13.34 कोटी किंमतीचे १३ किलो सोनं चोरीला गेल्यानंतर, मुंबई पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने केवळ ७२ तासांत गुन्ह्याचा छडा लावून गुजरातमध्ये लपून बसलेल्या तीन आरोपींना अटक केली आणि ११ किलोहून अधिक सोनं हस्तगत केलं. या प्रकरणातील अत्यंत तांत्रिक आणि सखोल तपासासाठी पोलीस आयुक्त देवेन भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दिलेला वेळ, ऊर्जा आणि कौशल्य अत्यंत प्रशंसनीय आहे.
या यशस्वी कारवाईनंतर आज एम. एच. बी. पोलीस ठाणे, दहिसर येथे सदिच्छा भेट घेऊन पोलीस पथकाचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी एपीआय आव्हाड , एपीआय सारगे , पोलीस निरीक्षक गोरडे , तसेच दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष शशिकांत कदम, वॉर्ड अध्यक्ष स्वप्नील जाधव, भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.