कोरोनातून बरे झाल्यानंतर किती कालावधीनंतर लस घ्यावी? जाणून घ्या केंद्राचे नवे निर्देश..
नवी दिल्ली,दि.२०:लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्यावी. तसेच स्तनदा मातांसाठीही लस सुरक्षित आहे, असे केन्द्र सरकारने म्हटले आहे.
मात्र, गर्भवती महिलांनी लस कधी घ्यावी याबाबत अदयाप निर्णय झालेला नाही. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 या तज्ञ गटाच्या समितीने लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सूचना केल्या होत्या. केंद्र सरकारने या सूचना मान्य केल्या आहे.