ब्रेकिंगमहाराष्ट्र

आंतरजिल्हा-राज्य प्रवासासाठी आता पुन्हा ई-पास काढावा लागणार:कसा काढाल ई-पास?

मुंबई.दि. २३:महाराष्ट्रात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. तसंच आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासावर देखील निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अत्यावश्यक कारणासाठी नागरिकांना आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करायचा झाल्यास प्रवासासाठी ई पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.ई पास साठी अर्ज करून प्रवास करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी संकेतस्थळावरून नागरिकांनी अर्ज करावा आणि ई पास काढून प्रवास करा असं आवाहन केलं आहे. ऑनलाइन ई पास काढण्यामध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी जवळच्या पोलिस स्टेशनची मदत घेऊ शकता असंही महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा याविषयी माहिती असणं आवश्यक आहे.
ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

ई-पास मिळविण्यासठी सोप्या टिप्स-
स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
स्टेप 2: तुमचे संपूर्ण नाव नोंद करा.
स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या महत्वाच्या बाबी
राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीतील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास ची आवश्यकता नाही. ई-पास मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्याकडे असेल. वैयक्तिक किंवा व्यक्तींचा समूह अर्ज करु शकतो. सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा. अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. टोकन क्रमांक सेव्ह करुन ठेवा. ई-पास अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे तो डाऊनलोड करुन ठेवा. ई-पास डिजीटल आणि प्रिंट स्वरुपात प्रवासादरम्यान सोबत ठेवा. ईपासचा गैरवापर करणे कायद्याप्रमाणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.

Press Note वाचण्याकरीता खालील लिंक वर क्लिक करा

EPassFinal

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!