महाराष्ट्र

दिलासादायक : मुंबईसह राज्यात कोरोना ला मोठा ब्रेक !

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) देखील वाढताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करोना निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील २४ तासात राज्यभरात १४ हजार ७३२ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.मुंबईत काल केवळ ५३० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,४७,३५४ आहे. तर, आजपर्यंत ५६,५४,००३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १,१२,६९६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यू दर १.९० टक्के आहे. तर, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९,१७,१२१ झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ नमुने (१५.४८ टक्के) कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. राज्यात सध्या ९,४९,२५१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ५ हजार ९९७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!