महाराष्ट्रमुंबईराजकीय

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी

धाराशिव /मुंबई : आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.य शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.तसेच पूरग्रस्तांना शासनाने दिलेल्या मदतीत वाढ करण्याची गरज असून त्यासाठी आपण केंद्र सरकार कडून राज्याला भरीव मदतीचे विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.तसेच पूरग्रस्तांना कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी मदत करण्याची गरज असून कॉर्पोरेट कंपन्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांना दत्तक घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केले.

केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्हातील बोरखेडा गावातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली.वाहुन गेलेल्या पिकांचे ; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली.यामध्ये मोठ्या प्रमाणत सोयाबीण पिकांचे नुकसान झाले होते.सोयाबीन,मिरची आणि ऊस या पिकांचे धाराशिव भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसुन आले.यावेळी धाराशिव च्या तहसिलदार मृणाल जाधव; रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; राजाभाऊ ओव्हाळ ; लातुर चे नेते चंद्रकांत चिकटे;डॉ सुधाकर गुळवे; संजय बनसोडे; धाराशिव जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे आदी नेते उपस्थित होते.

यावेळी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठवाड्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार आहोत असे आश्वासन दिले. ज्यांनी शेतीसाठि कर्ज काढले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज बँकांनी माफ केले पाहिजे. त्याबाबत आपण सर्व केंद्र आणि राज्य सरकार कडुन बँकांना कळवणार आहेत.आणि बँकांनी नुकसान ग्रस्त शेतकऱयांचे कर्ज माफ केले पाहिजे.अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.

शेतकऱ्यांनामिळालेली तातडीची मदत कामी असली तरी त्यात वाढिव मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकार कडे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना दिले. आज ना.रामदास आठवले यांनी धाराशिव,बिड,जालना आणि औरंगाबाद या भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतकऱयांच्या भेटी घेतल्या आणि नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी केली.

यावेळी ना. रामदास आठवले यांनी पूरग्रस्तांवर केलेली उत्स्फूर्त कविता…
कोसळले अस्मानी संकट
मराठवाड्यात पुरस्थिती बिकट….
अतिवृष्टीने शेतपिके झाली साफ …
म्हणून शेतकऱ्यांची कर्ज व्हावीत माफ!
कॉर्पोरेट कंपन्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांचे काही वाटत असेल सोयरसुतक
तर त्यानी घ्यावित पूरग्रस्त गावे दत्तक,
द्यावा सर्वांनी मदतीचा हात
राज्याला केंद्राची आहे साथ
त्यामुळे या अस्मानी संकटावर मिळून करू आपण मात…!!
— केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!