दिलासादायक! मुंबईसह राज्यात कोरोना रूग्ण संख्येत घट
मुंबई :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना आज दिलासादायक चित्र समोर आले आहे.आज काल चे तुलनेत आज राज्यात ३३ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
तर २९ हजार ६७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे.
दररोजच्या तुलनेत आजची रूग्ण संख्या घटल्याचं चित्र आहे.आपण पुढील आलेख पाहूयात
९ जानेवारी -४४३८८ रूग्ण
८ जानेवारी – ४११३४ रूग्ण
७ जानेवारी – ४०९२५ रूग्ण
६ जानेवारी – ३६२६५ रूग्ण
५ जानेवारी – २६५३८ रूग्ण
४ जानेवारी – १८४६६ रूग्ण
३ जानेवारी – १२१६० रूग्ण
२ जानेवारी – ११८७७ रूग्ण
१ जानेवारी – ९१७० रूग्ण
मुंबईतील परिस्थिती-
राज्यासह मुंबईमधील कोरोना परिस्थिती चिंतेचा विषय बनत आहे.आज दिवसभरात मुंबईत १३ हजार ६४८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.ही देखील एक दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ८७ टक्के इतका झाला आहे. तर मागील २४ तासांत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ४११ झाली आहे. सध्या मुंबईत १ लाख ३ हजार ८६२ सक्रीय रुग्ण आहेत.